Mhada Lottery Online Registration :
नमस्कार मित्रांनो, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबईतील 4083 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर 18 जुलै रोजी सोडत जाहीर होणार आहे.Mhada Lottery Online Registration
म्हाडाची ही घरे गोरेगाव, पहाडी, विक्रोळीच्या कन्नमवार नगर, बोरिवली, मालाड दादर, सायन परळ, दाडदेव, मध्ये आहेत. 22 मे पासूनच नोंदणी अर्ज-विक्री प्रक्रिया ही सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया 26 जून पर्यंत सुरू राहणार असून 18 जुलै रोजी वांद्रे पश्चिम इथल्या रंग शारदा सभागृहात सोडत करण्यात येणार आहे.
Mhada Lottery Online Registration :
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची मागील 1 वर्षापासून चर्चा सुरू होती; परंतु काही कारणामुळे सोडतिला उशीर झाला. मुंबई मंडळातील घरांसाठी शेवटची सोडत 2019 मध्ये काढण्यात आली होती. यात केवळ 217 घरांचा समावेश होता.
अखेर मंडळाने आता 4083 घरांच्या सोडतीच्या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यानुसार 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिले. Mhada Lottery Online Registration
कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे आहेत ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा