online gas ekyc:गॅस धारकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना केंद्र शासनाच्या वतीने सादर करण्यात आले आहे, यामध्ये एचपी गॅस असेल इंडियन असेल किंवा भारत गॅस धारक असेल यांना आपल्या गॅसची इ केवायसी करणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे, तरीही केवायसी कशा पद्धतीने करावी लागणार आहे याबद्दलची अधिकृत माहिती कशा पद्धतीने आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
online gas ekyc:
मित्रांनो आपण जर गॅस कनेक्शन वापरत असाल तर त्या गॅस कनेक्शन साठी आता आपल्याला ई केवायसी करावी लागणार आहे,म्हणजेच आपण आपण हयात आहात की नाही किंवा आपल्या गॅस कनेक्शन वरती इतर कोणी गॅस तर घेऊन जात नाही ना किंवा अधिक अनाधिकृत कामकाजाला आळा घालण्यासाठी शासनाकडून इकेवायसी आता बंधनकारक केलेली आहे.
केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- गॅस पुस्तक व
- स्वतः व्यक्ती
केवायसी करण्याचे प्रकार:
- केवायसी बायोमेट्रिकद्वारे करू शकता किंवा
- फेस कॅमद्वारे देखील करू शकता या दोन पद्धतीने आपण आपली केवायसी करू शकता
- परंतु केवायसी करण्यासाठी गॅस धारक स्वतः उपस्थित असणे आवश्यक आहे
केवायसी कोठे करावी?
ही केवायसी जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला आपल्या जवळील गॅस एजन्सीकडे जाऊन ई केवायसी करायचे आहे किंवा मिनी गॅस एजन्सी कडे देखील करू शकता.
जवळील महा ई सेवा केंद्र मध्ये केवायसी करता येऊ शकते का?
सदर इ केवायसी ही फक्त गॅस एजन्सी धारकाकडे करता येईल जवळील महा ई सेवा केंद्र धारकाकडे केवायसी करता येणार नाही
सदर केवायसी कधीपर्यंत करता येईल.
के वाय सी करायची असेल तर आपल्याला 31 मे 2024 पूर्वी करण बंधनकारक आहे. त्यानंतर केवायसी करता येणार नाही व आपल्याला गॅस कनेक्शन वरती जे अनुदान तीनशे रुपये प्रमाणे मिळतं ते देखील मिळणार नाही त्यासाठी सर्व गॅसधारकांना शासनाच्या वतीने सूचना देण्यात आलेले आहेत ही सदर केवायसी 31 मे पूर्वी पूर्ण करून आपण अनुदान योजनेचा लाभ घ्यावा.
हे देखील वाचा
अशाच माहितीसाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा