pashusanvardhan bi biyane scheme:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी बी बियाणे योजना ही शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे, यामध्ये शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावरती वैरण बियाणे मका व इतर धान्य मिळणार आहेत. तर यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर याची अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला या योजनेअंतर्गत शंभर टक्के लाभ मिळणार आहे.
pashusanvardhan bi biyane scheme:
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील काही जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या मार्फत 100% अनुदानावरती बी बियाणे पुरवण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू आहे याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील ही योजना सुरू आहे आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये योजना सुरू आहे की नाही हे पाहायचं असेल तर आपल्याला पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावे लागणार आहे परंतु सदर योजना ही पुणे जिल्ह्या जिल्ह्यासाठी सुरू आहे.
योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- सातबारा उतारा व
- विहित नमुन्यातील अर्ज
- इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत
अर्ज कोणाकडे सादर करावा
सदर योजनेमध्ये आपल्याला जर पात्र व्हायचं असेल तर वरील सर्व कागदपत्रे एकत्र गोळा करून सर्व कागदपत्रे आपल्याला पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सादर करायचे आहे त्यानंतर तात्काळ मध्ये म्हणजे लगेच आपल्याला बी बियाणे वाटप केली जाणार आहेत.
खालील फॉर्म भरून आपल्याला पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे
फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
मका बियाणे मागणी अर्ज
हे देखील वाचा
अशाच माहितीसाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा