construction workers jobs: बांधकाम कामगारांना मिळणार कामगार पेटी व 12 हजार,असा करा अर्ज

construction workers jobs :  नमस्कार बंधुंनो, आज आम्ही बांधकाम कामगारांसाठी काही महत्त्वपूर्ण योजनेची माहिती घेऊन आलो आहोत. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला शिक्षणासाठी, घरासाठी विविध कामांसाठी अनुदान दिले जाणार आहे.

चला तर मग पाहूयात कोणती आहे ही योजना जेणेकरून बांधकाम कामगारांना आर्थिक मदत मिळणार आहे व या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.Bandhkam Kamgar Yojana 2024

बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपण जर बांधकाम कामगार असाल तर आपल्याला याचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

construction workers jobs:

या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे. तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मुख्य चार योजनांचा आपल्याला लाभ घेता येणार आहे. या चार योजना कोणत्या आहेत व त्यांचे फायदे कोणते आहेत याविषयीची माहिती पाहुयात. Bandhkam Kamgar Yojana 2024

 

आवश्यक कागदपत्रे पहा

बांधकाम कामगार योजनेच्या मुख्य चार योजना :

1. सामाजिक सुरक्षा योजना

2. शैक्षणिक योजना

3. अर्थ सहाय्य योजना

4. आरोग्य विषयक योजना

मित्रांनो वर दिलेले हे बांधकाम कामगाराचे चार मुख्य योजना आहेत. आता या योजनेमध्ये कोणकोणते फायदे आहेत ते आपण पाहूयात.

सामाजिक सुरक्षा योजना

1. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिकृतीसाठी 30 हजार रुपये मदत मिळते.

2. बांधकाम कामगार अवजारे खरेदी करण्यासाठी १२००० रुपये पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते.

शैक्षणिक योजना

1. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना पहिली ते सातवीसाठी प्रतिवर्षी 2500 किंवा आठवी ते दहावीसाठी प्रतिवर्षी 5000 हजार रुपये रक्कम दिली जाते.

2. कामगाराच्या दोन्ही पाल्यांना इयत्ता दहावी व बारावी मध्ये 50% किंवा अधिक गुण मिळाल्यास 10 हजार रुपये अनुदान दिले जाते.

3. दोन्ही पाल्यांना इयत्ता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रति वर्षे 10 हजार रुपये रक्कम दिले जाते.

4. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता रक्कम दिली जाते.

आरोग्य विषयक योजना

1. नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर आजाराच्या उपचार यासाठी एक लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा दिले जाते.

2. बांधकाम कामगारास 75 टक्के अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये पर्यंत अर्थसहाय्य मिळते.

अर्थ सहाय्य योजना

1. कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास 5 लाख रुपये रक्कम दिले जाते.

2. नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये रक्कम दिले जाते.

3. नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीला पुढील पाच वर्षासाठी प्रति वर्ष 24 हजार रुपये दिले जाते.

बांधकाम कामगार नोंदणी साठी येथे क्लिक करा

या चारही योजनेचे अर्ज PDF Download करण्यासाठी येथे क्लिक करा

 

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top