Silt Free Dam Shiwar Yojana 2023 : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना सुरू, पहा संपूर्ण माहिती.

Silt Free Dam Shiwar Yojana 2023 : नमस्कार बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबवण्यास सुरुवात केलेली आहे. चला तर मग पाहूयात या योजनेचा कोणता फायदा मिळणार आहे. याविषयीचे संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला शासनाच्या या नवीन योजनेबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

Silt Free Dam Shiwar Yojana 2023 :

महाराष्ट्र शासनाच्या योजनेनुसार राज्यातील धरणांमधील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी राज्यातील धरणांमधील गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी ग्राम विकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय दिनांक ६ मे 2017 अन्वये गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. सदर योजनेची मुद्दत मार्च 2021अखेरीस संपलेले असल्याने सदर योजना यापुढे तीन वर्षासाठी राबवण्याबाबत दिनांक 16 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये मुद्दत वाढ दिली आहे. (Silt Free Dam Shiwar Yojana 2023)

परंतु जल स्त्रोतागार साठणे ही क्रिया कायम स्वरूपाची असल्याने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना पुढील 3 वर्षापर्यंत मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी राज्यात राबविण्याचा निर्णय दिनांक 20 /4 /2023 रोजी शासन निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे.

शासन निर्णय पहा :

गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजना राबवण्यासाठी जलसाठ्यातील पाणी आटलेले असणे व शेतकऱ्यांनी शेतात पिके लावलेले नसणे या दोन्ही बाबी एकाच वेळी घडायला पाहिजेत. त्यामुळे या कामासाठी फार कमी कालावधी उपलब्ध असतो म्हणून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना यशस्वी होण्यासाठी शासन, जिल्हा प्रशासन, तालुका स्तरावरील अधिकारी, ग्रामपंचायती, अशासकीय संस्था, या सर्वांचा मनापासून सहभाग आवश्यक आहे. या उद्देशाने महाराष्ट्र शासन आणि A.T.E चंद्रा फाउंडेशन मध्ये करार करण्यात आले आहे.

कोणत्या विभागाची कोणती कामे आहेत ते पहा :

शासन

1. जिल्ह्यांना दिलेल्या मुदतीत उद्दिष्ट साध्य करण्याची प्रवृत्त करणे.

2. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अंमलबजावणीसाठी जिल्ह्याचे प्राधान्य क्रमाने निवड करणे.

3. चालू असलेल्या कामाची नियमित आढावा घेणे.

4. गरज असेल तिथे वेळेवर अडचणी सोडवणे.

जिल्हा प्रशासन

1. या कामात समन्वय साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नोडल अधिकारी निश्चित करणे.

2. जिथे काम होऊ शकते अशा जलस्रोत त्यांची यादी तयार करणे.

3. स्वयंसेवी संस्था सोबत संयुक्त पणे कार्यक्रमाच्या उपक्रमांना पाठिंबा देणे. जिल्हा आणि ग्रामपंचायत यांना चालना देणे.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार राबवणाऱ्या गावांमध्ये नैसर्गिक शेती तसेच मागील त्याला ठिंबक सिंचन योजनेत 100% यशस्वी करणे.

A.T.E. चंद्रा फाउंडेशन

1. जल स्त्रोतांमधून गाळ काढताना जलसाठा वाढ किंवा भूजलपुनर्भरण किंवा दोन्हीवर आधारित प्राधान्य देण्यास मदत करणे.

अशाप्रकारे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबवण्यात येणार आहे.

बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेविषयी माहिती मिळेल. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top