Shatkari Dhanya Anudan yojana 2023.
नमस्कार शेतकरी बंधुंनो, आज आम्ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. केंद्र शासनाने धान्य उत्पादकांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णय यामध्ये धान्य उत्पादक शेतकऱ्यांना 15 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. चला तर मग पाहूयात शासनाने हा निर्णय कोणत्या प्रकारे घेतलेला आहे व या अनुदानाचे लाभ घेण्यासाठी कोठे व कसा अर्ज करायचे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला या अनुदानाचा देखील लाभ मिळेल. चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.
Shatkari Dhanya Anudan yojana 2023 :
शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांना 15 हजार रुपये रक्कम मिळणार असल्याची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे. यासाठी शासनाकडून 1 हजार कोटी रुपयांची निधी देेेेेखिल् देण्यात आली आहे. चला तर मग पाहूयात कशाप्रकारे या अनुदानाचा लाभ आपल्याला होणार आहे या अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहूयात.
केवळ धान्य उत्पादकांना मिळणार 15 हजार रुपये रक्कम
शेतकरी बंधूंनो, राज्याती धान्य उत्पादकांसाठी केंद्र शासनाने उत्पादकाला प्रति हेक्टर 15 हजार रुपये प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र शासनाने धान्य उत्पादकांना प्रोत्साहन रक्कम देण्यासाठी 1 हजार कोटी निधीला मान्यता दिली आहे. दिनांक १४ फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
प्रति हेक्टर 15 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम या योजनेचा लाभ फक्त राज्यातील अंदाजे 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.
ही रक्कम 2 हेक्टर मर्यादित शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे
2022-23 या खरीप हंगामात केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान्य लागवडीसाठी जमिनीनुसार प्रति हेक्टर 15 हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला होता.
मागील वर्षी म्हणजेच 2021-22 खरीप हंगामात 1 कोटी 33 लाख 79 हजार 892 क्विंटल धान्य खरेदी झाली होती. तेव्हा शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्यात आली नव्हती यापूर्वीच्या खरीप हंगामामध्ये धान्य उत्पादकांना प्रतिक्विंटल 700 रुपये अशी रक्कम प्रोत्साहन यापूर्वी देण्यात आली होती मात्र ही रक्कम प्रतिक्विंटल देण्यात येत असल्यामुळे काही अडचणी येत होत्या.
पहा 5 लाख शेतकरी बांधवांनी या योजनेसाठी केली नोंदणी
ज्या शेतकऱ्यांकडे 50 क्विंटल पेक्षा कमी धान्य उत्पादन आहे असे शेतकरी बांधवांच्या नावे 50 क्विंटल मर्यादा पेक्षा अधिक धान्य खरेदी करण्याचे प्रसंग आढळले. त्याचप्रमाणे काही शेतकरी शेजारी राज्याची धान्य महाराष्ट्रात आणल्याच्या तक्रारी देखील प्राप्त झाले होते.
यावर्षी 2022-23 योजने करिता धान्य उत्पादक शेतकऱ्यांनी सुमारे 5 लाख नोंदणी केली असून एकूण 6 लाख हेक्टर पेक्षा जास्त जमिनीवर धान्य उत्पादन झाले आहे.
या योजनेची थोडक्यात माहिती पहा :
शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम किती मिळणार?
प्रत्येक हेक्टर 15 हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांना ही रक्कम मिळणार आहे.
किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे?
केंद्र शासनाच्या घोषणा अनुसार राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील?
या योजनेचा लाभ फक्त धान्य उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
शेतकरी बंधुंनो आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण जवळील नॅशनल बँक किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया येथे जाऊन या योजनेविषयी अधिक माहिती मिळू शकता व अर्ज देखील भरू शकता. धन्यवाद!