van dhan vikas yojana 2023 : नमस्कार बंधुंनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका नवीन निर्णयाबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही माहिती आपल्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. चला तर मग शासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे ते पाहुयात.
van dhan vikas yojana 2023 :
प्रधानमंत्री वंदन विकास केंद्र ही योजना केंद्र शासनाने कार्यान्वित केली आहे. भारतीय राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचित नमूद केलेल्या महाराष्ट्रातील अनुसूचित क्षेत्र व इतर क्षेत्रांमधील सहाय्यता गटातील सदस्यांमार्फत गौण वनोउपज गोळा करने, गोळा केलेल्या गौण वनो उपजाचे मूल्यवर्धन करून विक्री करणे, या योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रातील आदिवासी कुटुंबाचे स्वयं सहायता गट स्थापन करणे व झालेल्या विक्रीचा नफा मूळ कोण वनोउपज गोळा करणाऱ्या आदिवासी लाभार्थ्याला मिळून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
van dhan vikas yojana 2023 :
वन धन योजनेची प्रभावी व जलद गतीने अंमलबजावणी होण्यासाठी शबरी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांच्या ऐवजी आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक यांना राज्य अभिकर्ता संस्था एस आय पी म्हणून नेमण्याची बाब तसेच या योजनेची अंमलबजावणी योग्य रीतीने होत आहे किंवा कसे यावर देखरेख ठेवण्यासाठी शासन स्तरावर राज्यस्तरीय सुकाणू समिती संदर्भ क्रमांक पाच च्या शासन निर्णयानुसार घटित करण्यात आली होती. संदर्भ क्रमांक सहा नुसार आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी राज्यस्तरीय सुकाणू समितीमध्ये राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग यांनी सुधारणा करण्याबाबत सुचविले असून त्याप्रमाणे सुधारणा करण्याबाबत शासनास विनंती केली आहे. त्यानुसार राज्यस्तरीय सुकाणू समितीमध्ये सुधारणा करण्याची भाग शासनाच्या विचाराधीन होती.