new ration shop application form maharashtra: रेशन दुकान मंजुरी प्रक्रिया सुरू,असा करा अर्ज

new ration shop application form maharashtra:रास्त भाऊ दुकानदारांसाठी आनंदाची बातमी आहे पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील 233 गावांमध्ये प्रशासनातर्फे रास्त भाव दुकाने मंजुरी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे,यासाठी संबंधित गावात चा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. महिला सहकारी संस्था व महिला स्वयंसहायता बचत गटांना या निमित्ताने चांगले संधी निर्माण झाली आहे, बचत गट व सहकारी संस्थांनी स्वतंत्र अर्ज द्वारे रस्ता भाव दुकानाची मागणी करावी अशा प्रकारचे आव्हान पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी dr.राजेश देशमुख यांनी केली आहे.ration card

new ration shop application form maharashtra:

नवीन रस्ता भाऊ दुकाने मागणीसाठी अर्ज केलेले इच्छुकांची आर्थिक स्थिती किमान तीन महिन्याचे धान्य उचलण्या एवढी असावी असे नमूद करण्यात आलेले आहेत,प्राधान्यक्रमानुसार रास्त भाव दुकान परवाने मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाद्वारे करणे आवश्यक राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.ज्या गावांसाठी रास्त भाव दुकाने जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे त्या गावांच्या पंचायत तलाठी कार्यालय मध्ये लावण्यात येणार आहे.

अर्ज प्राप्त झाल्यानंतर एक फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान अर्जाची छाननी करून स्थळ पाहाणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इच्छुकांनी मागणीचे अर्ज करावेत:

रास्त भाव दुकानदारांसाठी मागणी करावयाचे अर्ज तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. एक जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान हे अर्ज संबंधित पुरवठा शाखेमध्ये स्वीकारण्यात येणार आहेत.प्राधान्य क्रमानुसार दुकानांची मंजुरी प्रक्रिया पार पडणार आहे ज्या गावांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे त्याच गावांमध्ये इच्छुकांनी यासाठी मागणी अर्ज करायचे आहेत असे निर्देश जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेले आहेत.

पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 233 गावांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यात व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील सदर रास्त धान्य दुकान सुरू केले जाणार असल्याची माहिती राज्य शासनाचे वतीने देण्यात आलेली आहेत जशी इतर जिल्ह्यासाठी प्रक्रिया सुरू होईल आपल्यापर्यंत सर्व माहिती सादर केली जाईल

मार्गदर्शक सूचनानुसार प्राधान्यक्रम

पंचायत

ग्रामपंचायत सत्संग स्थानिक स्वराज्य संस्था

नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था संस्था

नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था हे अर्ज करू शकतात

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top