Dushkal madat Anudan 2024:
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा तालुक्यामध्ये आणि बऱ्याचश्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यासाठी शासनाकडून निधी वितरित केला जाणार आहे यासाठी प्रशासनाकडून ऑफलाइन स्वरूपामध्ये फॉर्म सादर करावे अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेले आहेत तर याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Dushkal madat Anudan 2024
शेतकरी बंधूंनो महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सद्यस्थितीला यावरती ऑफलाईन स्वरूपात फॉर्म भरण्यासाठी सांगण्यात आलेले आहे व त्यासाठी पुणे जिल्ह्यामधील बऱ्याचशा तालुक्यामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रातील बऱ्याचशा तालुक्यामध्ये ही योजना सद्यस्थितीला लागू आहे आपल्या तालुक्यामध्ये ही योजना लागू आहे की नाही हे जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला तालुका कृषी अधिकारी किंवा तलाठी भाऊसाहेब यांच्याशी संपर्क साधायचा आहे
नुकसान भरपाई योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा आठ उतारा
अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे
- सर्वप्रथम शेतकरी बंधूंना वरील सर्व कागदपत्रे एकत्र गोळा करून ऑफलाईन स्वरूपामध्ये फॉर्म भरायचा आहे
- व हा फॉर्म तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे त्यांच्याकडून ही सर्व कागदपत्रे एकत्र गोळा करून वरिष्ठ कार्यालयामध्ये कागदपत्र सादर केले जातात
दुष्काळ नुकसान भरपाई साधारण किती मिळेल
दुष्काळ नुकसान भरपाई साधारणता हेक्टरी दहा हजार पाचशे रुपये मिळेल अशा प्रकारची माहिती उपलब्ध आहे
तर अशाप्रकारे या योजनेचा लाभ घेऊन आपण या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता
योजनेचा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करून फॉर्म डाउनलोड करा