Farmer loan interest: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,शेतकऱ्यांचे पीक कर्ज व्याज झाले माफ,आता भरावी लागणार फक्त मुद्दल

Farmer loan interest:शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे,शेतकरी बंधूंनो आपण जर यापूर्वी पीक कर्ज घेतलं असेल तर आपल्याला आता व्याज भरण्याची आवश्यकता नाही तर हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तरीही योजना काय आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

Farmer loan interest:

आपण जर पीक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्ज घेतलं असेल तर ते आपण 31 मार्चपूर्वी भरावे.

आपण जर फक्त पीक कर्ज घेतलेला असेल आणि हे पीक कर्जाला जर आपल्याला व्याज लागलं असेल तर ते व्याज आता आपल्याला भरायची आवश्यकता नाही

व्याज भरण्याची आवश्यकता नाही

शेतकरी बंधूंनो आपण आपलं कर्ज काढल्यानंतर हे कर्ज नियमित भरण्यासाठी आपण 31 मार्चपूर्वी भरत असतो व शासनाकडून आपण जर नियमित कर्ज भरलं तर वेगवेगळ्या योजना आपल्यासाठी लागू होत असतात तर शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यापूर्वी आपण 31 मार्च रोजी आपले पीक कर्ज भरत होतो व व्याजाची रक्कम देखील आपण यापूर्वी भरत होतो.

पुन्हा महिनाभराच्या कालावधीमध्ये व्याजाची रक्कम ही पुन्हा आपल्याला मिळत होते. काही वेळेला ही रक्कम मिळण्यासाठी दोन महिने तीन महिने किंवा सहा महिन्याचा कालावधी लागत होत होता परंतु सद्यस्थितीला आपण जर कर्ज काढलं तर आपल्याला कर्जाची जी रक्कम आहे ती फक्त भरायचे आहे.

व्याजाची जी रक्कम आहे ती सद्यस्थितीला भरायची आवश्यकता नाही, कारण की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पुणे जिल्ह्यामध्ये तशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत

आता आपण जर ३ लाख रुपये कर्ज काढलं असेल आणि त्याला जर व्याज आले असेल तर आपल्याला आता फक्त मुद्दल भरायचे आहे व्याजाची रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.तर अशा प्रकारे आपणाला विनंती राहील की आपण 31 मार्चपूर्वी पिक कर्जाची रक्कम भरून व्याज सवलत घ्यावी.अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ला भेट द्यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top