Sukanya samriddhi yojana 2023 : या योजनेमध्ये 250 रुपये गुंतवल्याने 6.5 लाख रुपये परतावा मिळणार, पहा या योजनेची संपूर्ण माहिती.

Sukanya samriddhi yojana 2023. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी केंद्र सरकारकडून एका अतिशय महत्वाच्या योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या योजनेचा लाभ आपल्या घरातील मुलींना होणार आहे. या योजनेमध्ये आपल्याला थोडी रक्कम गुंतवल्याने अतिशय मोठा फायदा होणार आहे व ही खास योजना मुलींसाठी राबवण्यात आलेली आहे. चला तर मग कोणती आहे ही योजना जेणेकरून आपल्या थोडी रक्कम  गुंतवल्याने मोठा फायदा होणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा भरायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्या घरातील मुलींना या योजनेचा नक्कीच फायदा होईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

Sukanya samriddhi yojana 2023

केंद्र सरकारने आपल्या घरातील मुलींसाठी “सुकन्या समृद्धी योजना” ही राबवली आहे. ही एक बचत योजना आहे. तुम्ही जर या योजनेमध्ये आपल्या मुलीच्या नावावर खाते उघडून त्यात ठराविक रक्कम भरल्यास, आपल्या मुलीला 18 वर्षे झाल्यानंतर अतिशय मोठ्या स्वरूपात रक्कम मिळणार आहे. चला तर मग या योजने विषयीची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहूयात, जेणेकरून आपल्या मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. चला तर मग काय आहे ही योजना पाहूयात.

Sukanya samriddhi yojana 2023

आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या मुलीचे वय 10 वर्षे होण्याअगोदर बँकेत खाते काढणेे आवश्यक आहे. व त्यानंतर आपल्याला या योजनेमध्ये ठराविक रक्कम गुंतवावी लागणार आहे. ही रक्कम किमान 250 रुपये ते 1.5 लाख रुपये पर्यंत भरू शकता. पुढे जाऊन या योजनेचा लाभ आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी इत्यादी कामासाठी होऊ शकतो. व या योजनेचे आणखी एक विशेष म्हणजे आपण गुंतवलेल्या रकमेवर 7.60% दराने व्याज दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण खाते पोस्ट ऑफिस किंवा व्यवसायिक शाखे मध्ये काढू शकता. या योजनेचा लाभ एका कुटुंबामध्ये 2 मुलींनाच घेता येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहूयात.

Sukanya samriddhi yojana 2023

आवश्यक कागदपत्रे

  1. मुलीचा जन्म दाखला.
  2. वैद्यकीय प्रमाणपत्र.
  3. रहिवासी प्रमाणपत्र.
  4. रेशन कार्ड.
  5. आधार कार्ड.
  6. बँक खाते क्रमांक. इत्यादी.

  या योजनेची काही नियम व अटी

• खाते उघडण्याची या योजने अंतर्गत मुलीचे खाते हे वयाच्या  दहा वर्षे अगोदर असणे आवश्यक आहे.

• या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील दोनच मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

• या योजनेमध्ये पालकांना आपली मुलगी 18 वर्षे होईपर्यंत गुंतवणूक करायला लागते.

अर्ज कोठे करायचं ते पहा

आपल्याला जर या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्यायचा असेल. तर यासाठी अर्ज आपण जवळील पोस्ट ऑफिस किंवा जवळील बँकेशी संपर्क साधून या योजनेसाठी अर्ज भरू शकता.

आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्याही मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. धन्यवाद!

अशाच प्रकारच्या योजनांच्या माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top