Land Survey Online App : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी अशा एका ॲप बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. जेणेकरून आपल्याला या ॲपच्या माध्यमातून अतिशय मोठी मदत मिळणार आहे. या ॲपच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आपले शेत जमीन मोजता येणार आहे. चला तर मग पाहूयात कोणते आहे हे ॲप जेणेकरून आपल्याला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने शेतजमीन मोजणी करता येणार आहे. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या ॲपविषयीची संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला याचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
Land Survey Online App :
शेतजमिनी साठी अनेक जण वाद विवाद करत असतात. हे जमिनीचे वाद शेताचा बांध किंवा इतर जागेच्या कमी जास्त येण्यामुळे होतात. तुम्ही स्वतः शेतजमीन किंवा इतर कोणतेही जागा मोबाईल ॲप द्वारे मोजू शकता. अशीच एक ॲप ची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही कोणतेही जमिनीची मोजणी करू शकता.
तुम्ही या मोबाईल ॲपच्या साह्याने फक्त पाच मिनिटांमध्ये कोणत्याही जमिनीची मोजणी करू शकतात. हे ॲप google play store वर उपलब्ध आहे. या ॲपचे नाव आहे GPS कॅल्क्युलेटर. चला तर जाणून घेऊया या ॲपचा वापर करून जमीन मोजणी कशी करायची.
मोबाईल ॲप द्वारे जमीन मोजणी
1. सर्वप्रथम आपल्याला google play store वर जाऊन जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे ॲप डाऊनलोड करावे लागतील.
2. हे ॲप ओपन केल्यानंतर दोन पर्याय दिसतील.
3. यामध्ये पहिल्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या शेतजमिनीच्या बांधावर जाऊन तिथून चालत चालत चारही बाजूने घेरा मारून जमिनीची मोजणी करता येणार आहे.
4. दुसऱ्या पर्यायावर क्लिक केल्यास तुम्ही google मॅप मध्ये जाऊन तुमच्या जमिनीची जी हद्द आहे ती निवडून तुम्ही जमिनीची मोजणी करू शकता.
तर या दोन पद्धतीने तुम्ही मोबाईल ॲप द्वारे जमिनीची मोजणी करू शकता. यामधील पहिली पद्धत अशी आहे की तुम्ही जमिनीच्या चारी बाजूने बांधावर चालून जमिनीची मोजणी करू शकता. तर दुसरा पर्याय असा आहे की google मॅप च्या साह्याने बांधाचे चार बाजू सिलेक्ट करून जमीन मोजणी करू शकतात. हे ॲप्लिकेशन चालवणे एकदम सोपे आहे.
अशा पद्धतीने आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आपली शेत जमीन मोजणी करू शकता.
शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल मग इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ॲपच्या माध्यमातून आपले शेतजमीन मोजण्यात मदत मिळेल.
धन्यवाद!