Aadhar card Pan card Link Now : पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक कसे करावे, पहा संपूर्ण माहिती.

Aadhar card Pan card Link Now : नमस्कार बंधूंनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे. कोणत्याही व्यवसायासाठी किंवा खाजगी कामांसाठी आपल्याला दोन कार्ड हे सतत उपयोगी पडतात. एक म्हणजे आधार कार्ड व दुसरे म्हणजे पॅन कार्ड. आपल्या सर्वांना माहितीच आहे शासन सर्वांना सतत सूचना देत आहे की आपला आधार कार्ड नंबर हा पॅन कार्ड ला लिंक असणे आवश्यक आहे नाहीतर आपल्या पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकतो.

तर आजच्या या लेखामध्ये आम्ही आपल्याला सांगणार आहोत की आपला आधार कार्ड पॅन कार्ड ला कसे लिंक करायचे, बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याविषयीची संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

Aadhar card Pan card Link Now :

भारतातील सर्व नागरिकांकडे आधार कार्ड आहे. शासनाकडून आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्याच्या सूचना वेळोवेळी निर्गमित करण्यात आले आहेत.

30 जुन 2023 पर्यंत आधार पॅन लिंक न केल्यास कार्डलिस्ट रद्द करण्याबाबत सूचना देण्यात आले आहेत. काही लोकांनी वेळ न गमवता सरकारची आज्ञा मानता त्यांचे आधार आणि पॅन एकत्र जोडले आहेत; परंतु अजूनही अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलेले नाही. तुमच्यासोबत असे काही होऊ नये हे लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सांगणार आहोत. ही पद्धत खूप सोपी आहे हे आपण स्वतः करू शकतात.

आयकर विभागाने पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक करण्याची मुदत अनेक वेळा वाढवली आहे. महत्त्वाचे कागदपत्रे जोडण्याची सध्याची अंतिम तारीख 30 जुन 2023 आहे.

आपण घरबसल्या कशाप्रकारे लिंक करू शकता ते पहा :

सर्वप्रथम आपल्याला खाली दिलेल्या आयकर विभागाच्या वेबसाईटला भेट द्यावे लागेल.

https://www.incometax.gov.in/iec/foportal/

• यानंतर आपल्याला येथे आधार पॅन लिंक चे ऑप्शन मिळेल.

• आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक केल्या नंतर लिंक आधार स्टेटस वर क्लिक करा.

• आता तुम्हाला एक फॉर्म मिळेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार क्रमांक टाकावा लागेल आणि लिंक आधार स्टेटस वर क्लिक करावे लागेल.

• तुम्ही जर पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले असेल आणि त्या यशस्वीरित्या पूर्ण झाले असेल तर आपल्या मोबाईल नंबर वर आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक झालेले   SMS येईल.

अशाप्रकारे आपण घरबसल्या आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंकू करू शकता.

बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर आपल्या बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करता येईल. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top