Land Record maharashtra : मित्रांनो, आपल्याला वडिलोपार्जित मिळालेली जमीन आपल्या नावावर करताना किंवा एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती तुमच्या नावावर करण्यासाठी किती खर्च येतो. तुम्हाला तर माहीतच असेल. बहुतांशी शेतकरी खेड्यापाड्यातील असल्यामुळे जमीन नावावरती करताना ( land Transfer ) त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळली जाते.
या सर्व बाबींचा विचार करून शासनाकडून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्या अंतर्गत ओडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर फक्त 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करता येणार आहे.
जमीन 100 रुपये मध्येे नावावर करा :
जमीन आपल्या नावावर करण्यासाठी फक्त आपल्या शंभर रुपये लागणार आहेत. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया काय आहे? अर्ज कसा करावा? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. Land Record maharashtra
सद्यस्थितीमध्ये जमीन नावावर करणे म्हणजे एखादे लढाई खेळण्यासारखेच आहे. जणू, कारण जमीन नावावर करताना अनेक अडचणी समोर येतात. त्याचप्रमाणे ही संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ असल्याने आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर मध्यस्थी व्यक्तींकडून पैसे घेतले जात असल्याकारणाने या गोष्टींकडे शेतकरी दुर्लक्ष करतात परिणामी हे प्रक्रिया किचकट होते. त्यानंतर विपरीत परिणाम आपल्या संपत्ती किंवा जमिनीवर होतात.