Farmers home loan scheme 2023 : शेतकऱ्यांच्या घरासाठी बँक देणार 50 लाख रुपये पर्यंत कर्ज ,पहा कोणती आहे ती बँक?

Home loan :  नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी बँकेकडून एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. शेतकरी बंधूंनो आपण जेव्हा आपल्या स्वप्नांचा घर बांधण्याचा विचार करतो. तेव्हा आपल्याकडे पुरेसे पैसे नसते. तेव्हा आपण कर्ज घेण्याचा निश्चय करतो. तेव्हा आपल्या मनात आणखी एक विचार येते की कर्ज फक्त नोकरदार वर्ग, व्यावसायिक वर्ग ह्यांनाच गृह कर्ज दिले जाते. जवळपास आपण संबोधले तर नोकरदार वर्ग जास्त गृह कर्ज घेत असतो. आणि मिळणाऱ्या पगारांमधून मासिक हप्ता भरत असतो. परंतु सध्याच्या काळात नोकरदार वर्ग व  व्यवसायिक वर्ग प्रमाणे शेतकऱ्यांना देखील गृह कर्ज दिलेे जाणार आहे. हो हे खरे आहे, आपण जर शेतकरी असाल व आपन आपले स्वप्नाचे घर बांधायचे विचार करत असाल तर, आपल्याला बँक देणार आहे गृह कर्ज. शेतकऱ्यांना त्यांच्या स्वप्नातील  घर बांधण्या करिता बँकेमार्फत कमी व्याजदरात 1 लाख ते 50 लाख पर्यंत कर्ज दिले जाणार आहे. व त्याचबरोबर कर्ज  परतफेड करण्यासाठी पुरेसा वेळ देखील देणार आहे.

Home loan scheme :

शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांच्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी “Farmer home loan scheme” काय आहे; व कोणते बँक देणार शेतकऱ्यांना घरासाठी 1 लाख पासून ते 50 लाख पर्यंत कर्ज, व कर्जाबरोबर साधारण व्याज किती असेल तसेच परत फेडसाठी किती मुद्दत मिळणार, त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्याला मिळणार याचा लाभ याविषयीची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा. चला तर मग या लेखनाला सुरुवात करूया.

Star 𝙺𝚒𝚜𝚊n 𝙶𝚑𝚊𝚛 yojana :

शेतकरी बंधूंनो आपल्याला माहित आहे. आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. परंतु या कृषी प्रधान देशांमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही हालकीची आहे; त्यामुळे त्यांना आपले स्वतःचे स्वप्नाचे घर बांधणेे किंवा दुरुस्त करणे देखील शक्य होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन बँक ऑफ इंडिया या बँकेने “स्टार किसान घर योजना” सुरू केली आहे. या योजनेत बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी व घर दुरुस्त करण्यासाठी कमी व्याज  दरात 1 लाख ते 50 ते लाख पर्यंत गृह कर्ज दिले जाणार व कर्ज फेडण्यासाठी पुरेसा वेळ देखील देण्यात येणार आहे.

𝙷𝚘𝚖𝚎 𝚕𝚘𝚊𝚗 :

गृह कर्जावर व्याज किती? व परतफेड करण्यासाठी ची मुदत किती याविषयी पाहूयात.

शेतकरी बंधूंनो या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये घर अथवा फार्महाउस बांधायचे आहे, किंवा सध्या असलेल्या घराची दुरुस्ती करायची असल्यास त्यांना या गृह कर्जाचा लाभ मिळेल. नवीन घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना 8.05% व्याजदराने 1 लाख ते 50 लाख पर्यंत कर्ज मिळू शकते. तसेच कर्ज फेडण्यासाठी  15 वर्षापर्यंत मुद्दत देखील दिली जाणार आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ :

• ज्या शेतकऱ्यांचे खाते बँक ऑफ इंडिया मध्ये आहे, अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

• बँक ऑफ इंडिया मध्ये kcc खाते असलेले कृषी कार्यात गुंतलेले शेतकरी, त्यांना या योजनेअंतर्गत या कर्जाचा लाभ मिळू शकतो.

• शेतकरी बंधूंनो या योजनेअंतर्गत (IT Return)  देण्याचे देखील आवश्यकता नाही.

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर गृह कर्ज घ्यायचे असेल तर आपण जवळील बँक ऑफ इंडिया या शाखेत जाऊन  “𝚂𝚝𝚊𝚛 𝚔𝚒𝚜𝚊𝚗 𝙶𝚑𝚊𝚛 𝚢𝚘𝚓𝚊na” याविषयी अधिक माहिती घेऊ शकता.

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही योजना उपयुक्त वाटली असेल; तर जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top