Shettale Anudan Yojana 2023 : नमस्कार शेतकरी बंधुंनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. चला तर मग पाहूयात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी किती टक्के अनुदान दिले जाणार आहे व या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या लेखनाला सुरुवात करूयात.
Shettale Anudan Yojana 2023 :
शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे शेती म्हटलं की त्यासाठी लागणारे साधने, पाण्याचा स्त्रोत, औषधे, बियाणे इत्यादींची गरज पडते. शेतकऱ्याला शेतामध्ये पीक घेण्यासाठी सर्वप्रथम त्याच्याजवळ उपलब्ध पाण्याची पडताळणी करून त्याच्यावरच तो चालणारी बारिशची पिके घेत असतो. (Shettale Anudan Yojana 2023)
पावसाळ्यामध्ये शक्यतो विहीर, बोरवेल इत्यादी मध्ये पाण्याची कमतरता भासत नाही. हिवाळ्यामध्ये हळूहळू पाण्याची कमतरता भासते. पिकाला जर वेळेवरती पाणी नाही मिळाले तर उत्पन्न कमी निघू शकते. उन्हाळ्यामध्ये तर काही शेतकरी पीक घेत नाहीत कारण उन्हाळ्यात विहीर बोरवेलचे पाणी कमी होऊ लागते. पण शेतकऱ्यांनी जर शेतामध्ये शेततळे केले तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल.
शेततळे अनुदान योजना
शासन शेतकऱ्यांना शेततळे करण्यासाठी अनुदान देत आहे तसेच शेततळ्याचे अस्तरीकरण करण्यासाठी सुद्धा अनुदान दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेततळे करण्याकरिता नक्कीच फायदा होणार आहे.
वैयक्तिक शेततळे करिता सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच सामूहिक शेततळे साठी सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक खाते क्रमांक
- पासवर्ड साईज दोन फोटो
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर
- शेतीचा सातबारा
- आठ अ उतारा
- पॅन कार्ड, इत्यादी.
शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी किती अनुदान मिळणार आहे ते पहा :
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी साधारण 90 हजार ते 1 लाख रुपये पर्यंत अनुदान दिलेे जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करायची ते पहा :
शेतकरी बंधूंनो आपल्याला जर या शेततळे योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यासाठी अर्ज खालील लिंक वर क्लिक करून महाडीबीटी च्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. धन्यवाद!