Pm shram yogi Mandhan yojana 2023 :
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाकडून एका अतिशय महत्त्वपूर्ण योजने बद्दल माहिती घेऊन आलो आहोत.ही योजना आपल्यासाठी अतिशय उपयुक्तक्त ठरणारी आहे, आपण जर या योजनेमध्ये थोडी रक्कम गुंतवली तर आपल्याला मोठ्या प्रमाणात पेन्शन मिळू शकते. चला तर मग कोणती आहे ही शासनाची नवीन योजना जेणेकरून आपल्याला थोडी रक्कम गुंतवल्याने मोठा फायदा होऊ शकतो व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत व या योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेविषयीची संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.
Pm shram yogi Mandhan yojana 2023 :
असंघटित कामगारांच्या वृद्धत्व संरक्षण आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना’ ही राबविण्यात आलेली आहे. शासनाची ही एक लाभदायक योजना आहे. आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत व या योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती पाहूयात.
Pm shram yogi Mandhan yojana 2023 :
असंघटित कामगार म्हणजे, जे कोणत्याही कंपनीत काम करत नाही व ते असंघटित क्षेत्रात कार्यरत असतात जसे की वीट भट्टी कामगार, चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, रस्त्यावरील विक्रेते, धोबी, रिक्षा चालक, भूमी हीन मजूर, अशा प्रकारचे कामे करणाऱ्यांना असंघटित कामगार असे म्हणतात. आपल्या देशातील असंघटित कामगारांची संख्या जवळपास 42 कोटीच्या वर आहे. त्यामुळे केंद्र शासनाने ही नवीन योजना राबवली आहे. चला तर मग या योजनेविषयी जाणून घेऊयात.
Pm shram yogi Mandhan yojana 2023 :
या योजनेमध्ये कोणी इच्छुक असल्यास तो यात गुंतवणूक करू शकतो. कंट्रीब्यूटरी म्हणजे तुम्हाला यात थोडी रक्कम गुंतवावी लागते. या योजनेमध्ये गुंतवणूकदार 60 वर्षाचा झाल्यानंतर त्याला किमान 3 हजार रुपये पर्यंत महिना पेन्शन मिळते. या योजनेमध्ये अकस्मात लाभार्थीचा मृत्यू झाल्यास लाभार्थीच्या जोडीदाराला निवृत्ती वेतनात 50% हक्क असते; परंतु ही पेन्शन योजना फक्त लाभार्थीच्या जोडीदारालाच मिळते.
या योजनेसाठी गुंतवणूक किती लागते ते पहा
आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपले वय 18 ते 40 या दरम्यान असणे आवश्यक आहे व वयाच्या साठ वर्षे होईपर्यंत अर्जदाराला 55 रुपये ते 200 रुपये आर्थिक महीना रक्कम भरावी लागते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम देखील आहे ते पहा
1 अर्जदार हा संघटित क्षेत्रात नोकरीला नसावा.
2 अर्जदार हा असंघटित कामगार असणे आवश्यक आहे.
3 अर्जदाराचे बँक बचत खाते असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- पासपोर्ट साईज दोन फोटो.
- बँक खाते क्रमांक.
- जातीचा दाखला.
- उत्पन्नाचा दाखला, इत्यादी.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे भरायचा ते पहा
आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण या योजनेसाठी अर्ज जवळील CSC केंद्रा वर जाऊन या योजनेसाठी अर्ज भरू शकता. धन्यवाद!
अधिक माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा
या app च्या माध्यमातून मिळेल ५ लाख पर्यंत कर्ज
शेतकऱ्यांना मिळणार ३ लाख बिनव्याजी कर्ज पहा सविस्तर माहिती