कांद्याच्या १६ गोण्यांना मिळाली ७१ रु पट्टी: onion benefits:शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे कारण की शेतीसाठी केलेल्या खर्चापेक्षा उत्पादन हे अगदी कमी पडत असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जगाव की मरावं असा प्रश्न निर्माण झालेला आहे, ही बातमी आहे करमाळा तालुक्यामधील तालुक्यातील कल्याण वारगड या शेतकऱ्याने आपल्या कांद्याच्या 16 गोण्या विक्रीसाठी मार्केटमध्ये पाठवल्या तर या 16 गोण्यांची पट्टी 71 रुपयेत्या शेतकऱ्याला मिळालेले आहे.
कांद्याच्या १६ गोण्यांना मिळाली ७१ रु पट्टी
शेती पिकामध्ये कांद्याला हमखास बाजार भाव मिळून देणार हे पीक आहे म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. परंतु कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जनतेतील कल्याण भानुदास वारकड या शेतकऱ्यांनी 16 कांद्याचे गोण्या त्याचं वजन 773 किलो या कांद्याच्या दराला फक्त 71 रुपये मिळालेले आहेत तर त्या शेतकऱ्याने ज्या मोकळ्या पिशव्या आणल्या होत्या त्या मोकळ्या पिशव्यांना 512 रुपये अजूनही त्या दुकानदाराचे देणे बाकी आहे
सोलापूर येथील बाजारात सोळा कांद्याचे पिशव्या पाठवल्या होत्या त्याचे वजन 773 किलो भरले कांद्याच्या दोन प्रतवारी करण्यात आल्या यामध्ये नऊ पिशव्या ह्या 440 किलोच्या मालाचे 660 रुपये झाले तर सात पिशव्या याचे ३३३ रुपये झाले.एकूण ९९३ आले त्यातून हमाली 61 रुपये तोलाई 36 रुपये श्री हमाली २४ रुपये मोटार भाडे आठशे रुपये असा एकूण खर्च 921 रुपये आला व खर्च वजा करून वारगड यांना हातात 71 रुपये मिळाले.परंतु कांद्याच्या ज्या पिशव्या मार्केटमध्ये सादर केले होते या पिशव्यांचे 512 रुपये हे त्या दुकानदाराला देणे आहे
अशी अवस्था आपल्या शेतकरी राजाची झाली आहे.तरी शासनाने लवकरात लवकर कांद्याला हमी भाव द्यावा अशी शेतकर्याची अपेक्षा आहे.