milk anudan 2024: महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राज्यातील सहकारी संस्था व संघ व खाजगी दूध संस्थांना आता प्रतिलिटर पाच रुपये अनुदान यापूर्वी मिळत होते हे फक्त एका महिन्यासाठी होते. परंतु शासनाने आता यामध्ये आणखी दोन महिन्यासाठी याला जे अनुदान आहे ते वितरित करण्यासाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. हा जो शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत आज 26 फेब्रुवारी 2024 रोजी सादर करण्यात आलेला आहे तर कोणाला अनुदान मिळाल्याबद्दल ची माहिती जाणून घेऊया.
milk anudan 2024
सर्वप्रथम शेतकरी बंधूंना ह्या अनुदानामध्ये जर पात्र व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन आपल्या सॉफ्टवेअर मध्ये सर्व गुरांच्या tag ची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचा युनिक आयडी हा तयार करून आपल्याला दूध संघाकडे सादर करायचा आहे त्यानंतर आपल्याला अनुदान मिळणार आहे व हे अनुदान यापूर्वी फक्त जानेवारी 2024 करता होते परंतु याची मर्यादा आता वाढवण्यात आलेली आहे हे अनुदान शेतकऱ्यांना 10 मार्च 2024 पर्यंत मिळणार आहे.
शासन निर्णय व अनुदान प्रक्रिया पहा
शासन निर्णय पहा
हे देखील वाचा