Mahamesh yojana 2024 Online Apply: सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र राज्य शासनाच्या महामंडळाकडून आता महामेष योजनेअंतर्गत शेळी मेंढी गट त्याचबरोबर कुकूटपालन साठी अनुदान मिळणार आहे याची अर्ज प्रक्रिया सुरू झालेले आहे व 26 सप्टेंबर 2024 पर्यंत यासाठी अर्ज सुरू असणार आहेत. तर यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे कोणत्या वेबसाईट वरती अर्ज भरावा लागेल आवश्यक कागदपत्रे काय आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
Mahamesh yojana 2024 Online Apply:
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महामेष योजनेअंतर्गत आता 75 टक्के अनुदानावरती कुकुट पलन पक्षी यासाठी अनुदान आपल्याला मिळणार आहेया योजनेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर ऑनलाईन स्वरूपामध्ये आपल्याला अर्ज भरायचे आहेत यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत याबद्दलची माहिती पाहूया
आवश्यक कागदपत्रे
१) जातीचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचा)
२) आधार कार्ड
३) रेशन कार्ड
४) बँक पासबुक
५) परसातील कुक्कुटपालनासाठी अर्जदाराकडे स्वत:ची पुरेशी जागा असल्याबाबत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र (बंधपत्र नमुना क्र. ६ नुसार)
६) अपत्य स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. २ नुसार)
७) स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. ५)
८) दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
• लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती :-
१. लाभार्थी हा भटक्या जमाती (क) या धनगर व तत्सम जमाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्र धारण करणारा व १८ ते ६० या वयोगटातील असावा.
२. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात यावा.
३. परसातील कुक्कुटपालनासाठी निवडलेल्या लाभार्थ्याकडे स्वतःची पुरेशी जागा असावी.
४. लाभार्थी निवडताना भटक्या जमाती – क या प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीतील ३० टक्के महिला व ३ टक्के दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात यावे.
५. व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी महामंडळ यांनी सदर योजनेचे सनियंत्रण करावे व योजनेची प्रसिद्धी करावी.
६. अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवा निवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतींनिधी नसावा.
.
सदर योजने अंतर्गत भटक्या जमाती (क) या प्रवर्गासाठी धनगर व तस्तम जमाती साठी ७५% अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपना साठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे .
टीप:सदर योजना हि फक्तभटक्या जमाती (क) या प्रवर्गासाठी धनगर व तस्तम जमाती साठी आहे
अ.क्र. | तपशील | संख्या | खर्च (रुपये) |
---|---|---|---|
1 | ४ आठवडे वयाच्या सुधारीत देशी प्रजातीच्या पक्ष्यांची खरेदी किंमत (प्रती पक्षी रु. ६०/- प्रमाणे) | १०० | रु.६,०००/- |
2 | दोन महिन्याचे कुक्कुट पक्षी खाद्य (प्रती पक्षी २०. कि.ग्रॅ. या प्रमाणात) दर रु. ३०/- प्रती किलो | २०० कि.ग्र | रु.६,०००/- |
3 | एकूण प्रकल्प किमत | रु. १२,०००/- | |
4 | लाभार्थी हिस्सा (२५%) | रु. ३,०००/- | |
5 | शासन अनुदान (७५%) | रु. ९,०००/- |
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अशाच माहितीसाठी खालील ग्रुप जॉईन करा
आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा
आपला telegram ग्रुप जॉईन करा
अ