e shram card pension scheme 2023: ई श्रम कार्ड च्या माध्यमातून मिळणार ३००० पर्यंत महिना पेन्शन,जाणून घ्या सविस्तर

e shram card pension scheme 2023:कामगार आणि रोजगार मंत्रालय, जे भारत सरकारच्या सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या मंत्रालयांपैकी एक आहे, विविध कामगार कायदे लागू करण्याशी संबंधित आहे, जे कामगारांच्या सेवा आणि रोजगाराच्या अटी आणि नियमांचे नियमन करतात, तसेच त्यांचे संरक्षण आणि संरक्षण करतात. कामगारांचे हित. आणि अंमलबजावणीद्वारे संघटित आणि असंघटित दोन्ही क्षेत्रांमध्ये कल्याणकारी आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करून देशाच्या कामगार शक्तीचे जीवन आणि प्रतिष्ठा सुधारण्यासाठी सतत कार्यरत आहे.e shram card pension scheme 2023

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी ई-श्रम पोर्टल विकसित केले आहे, जे आधारशी जोडले जाईल. त्यात नाव, व्यवसाय, पत्ता, शैक्षणिक पात्रता, कौशल्य संच आणि कुटुंब इत्यादी तपशील असतील जेणेकरुन त्यांच्या रोजगारक्षमतेचा इष्टतम वापर करता येईल आणि त्यांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळावा. स्थलांतरित कामगार, बांधकाम कामगार, टमटम आणि प्लॅटफॉर्म कामगार इत्यादींसह असंघटित कामगारांचा हा पहिलाच राष्ट्रीय डेटाबेस आहे.Eshram Card Holder Pension 2023

e shram card pension scheme 2023:

मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण ही श्रम कार्ड धारकांना खरोखरच तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे का नाही याबद्दलची जी सविस्तर माहिती आहे आपण आज पाहणार आहोत याचबरोबर ही श्रम कार्ड योजना काय आहे याचे फायदे काय आहेत याचा लाभ कशा पद्धतीने घ्यावा या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण हा जो लेख आहे संपूर्ण वाचा म्हणजे या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपल्याला मिळेल

आधारशी जोडण्यासाठी बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, टमटम आणि प्लॅटफॉर्म कामगार, फेरीवाले, घरगुती कामगार, शेती कामगार इत्यादींसह सर्व असंघटित कामगारांचा केंद्रीकृत डेटाबेस तयार करणे.

असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजनांचे एकत्रीकरण जे कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि त्यानंतर इतर मंत्रालयांद्वारे प्रशासित केले जात आहे.Eshram Card Holder Pension 2023

इ श्रम कार्ड कोण काढू शकतो?

ई श्रम कार्ड असा प्रत्येक व्यक्ती काढू शकतो जो असंघटित कामगार आहे याच्यामध्ये अट फक्त एवढीच आहे की त्यांचा पीएफ कट होत नसावा. याव्यतिरिक्त त्यांचा इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला नसावा, असा प्रत्येक व्यक्ती ई श्रम कार्ड  काढू शकतो.जसे की उदाहरणार्थ आपण जर गुराळ व्यवसायिक असाल, आपण फेरीवाले असेल, आपण टपरी व्यवसाय असाल, आपण घरगुती कामगार असाल, आपला न्हावी व्यवसाय असेल, किंवा  शेती कामगार असाल,वीट भट्टी कामगार असाल ,ऊस तोडणी कामगार असाल किंवा आपला कोणताही लहान मोठा व्यवसाय जर असेल तर आपण हे जे ई श्रमकार्ड आहे ते आपण काढू शकता.

e shram card pension scheme 2023

ई श्रम कार्ड फायदे:

  • हे कार्ड कायमस्वरूपी मोफत असणार आहे
  • यामध्ये आपल्याला २ लाखाचा विमा आहे.
  • कार्ड काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकरण्यात येत नाही.
  • आपण जर आपला व्यवसाय नोंदणी केली तर भविष्यामध्ये आपल्याला त्या व्यवसायावर एखादी योजना मिळू शकते किंवा भविष्यात जर आपल्याला कर्ज प्रकरण करायचे असेल तर या कार्ड धारकास प्राधान्य राहील अशा प्रकारची माहिती शासनाकडून उपलब्ध केली आहे
  • सर्व असंघटीत कामगार याची नोंद केल्यामुळे कोणत्या व्यवसायासाठी किती लोक काम करतात याची अचूक माहिती शासनाकडे उपलब्ध राहते.त्यामुळे भविष्यात त्यांचा प्रमाणे एखादी योजना राबविता येऊ शकते.Eshram Card Holder Pension 2022

ई श्रम कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा

ई श्रम कार्ड काढावे कि नाही?

ई श्रम कार्ड जर आपण काढले तर याच्यामध्ये सर्वप्रथम दोन लाखाचा विमा आपल्याला मिळणार आहे, या व्यतिरिक्त भविष्यामध्ये शासनाकडून कर्ज स्वरूपामध्ये निधी उपलब्ध होऊ शकतो आणि व्यवसायासाठी जर एखादी नवीन योजना निघाली तर त्याच्यामध्ये आपल्याला प्राधान्य राहू शकते. ई ई श्रम कार्ड काढल्याच्या नंतर शासनाकडे आपला संपूर्ण डेटा उपलब्ध होईल ज्याच्यामध्ये आपण कोणते व्यवसायासाठी किती कामगार आहेत याच्याबद्दलची माहिती शासनाकडे उपलब्ध राहील. जसं की महाराष्ट्र राज्यामध्ये नाव्ही व्यवसाय कितीआहेत, टेलर व्यवसाय किती आहेत,किंवा इतर व्यवसाय किती आहेत  याच्याबद्दलची माहिती ई श्रम कार्ड काढल्याच्या नंतर शासनाकडे उपलब्ध राहील आणि त्यानुसार शासनाची एखादी योजना उपलब्ध होऊन त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो कारण की हे कार्ड अगदी मोफत आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चार्जेस नाही त्यामुळे हे कार्ड काढलेले नक्कीच फायद्याच राहीलEshram Card Holder Pension 2022

अट:

  • ज्यांचे वय 16-59 वर्षांच्या दरम्यान आहे.तोच यामध्ये पात्र होऊ शकतो
  • ईपीएफओ/ईएसआयसी किंवा एनपीएस (सरकारी अनुदानित) चे सदस्य नसावे
  • INCOME TAX भरणारे नसावे

ई श्रम कार्ड काढण्यासाठी NIC कोड

ई श्रम कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधारकार्ड
  • बँक पासबुक
  • मोबाईल
  • वारसाची जन्मतारीख व इतर माहिती
  • आपण काय व्यवसाय करता त्याची माहिती इ.

या योजनेत सहभागी झाल्यास खरच ३००० पेन्शन मिळणार का?

नाही.आपण जर फक्त ई श्रम कार्ड काढले तर आपल्याला यामध्ये ३००० पेन्शन मिळणार अशी बरीच माहिती आपल्याला प्रसारमाध्यमातून मिळत असेल परंतु हे कार्ड काढल्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळणार नाही

यापूर्वी कोरोना काळात संपूर्ण भारत देशात महामारी पसरली होती आणि अशा वेळी वेगवेगळे व्यवसायिक यांनी शासनाकडे मदत मागितली होती कारण कि सर्वांचे व्यवसाय हे बंद होते.त्यावेळी शासनाने बांधकाम मजूर,जनधन खाते धारक महीला यांना ,अपंग यांना आर्थिक मदत केली होती.त्यावेळी नाव्ही ,टेलर या व्यवसाय करणाऱ्या लोकांनी देखील आम्हाला मदत मिळावी हि अपेक्षा केली होती.परन्तु त्याची माहिती शासनाकडे उपलब्ध नव्हती कि भारत देशात किती असंघटीत कामगार आहेत व ते कोणत्या व्यवसायामध्ये नोंदणीकृत आहेत,त्यानंतर शासनाने भविष्यात असा कोविड सारखा प्रसंग निर्माण झाला तर सर्व भारत देशातील असंघटटीत कामगाराची माहिती आपल्याकडे असावी या हेतूने हि योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.Eshram Card Holder Pension 2022

या योजनेमध्ये आपल्याला महिना ३००० हा मिळणार नाही

ई श्रम कार्ड सविस्तर माहिती पहा

परंतु आपणा जर प्रतीमहिना २०० रुपये जर शासनाला  भरले तर आपल्याला ६० वर्ष नंतर प्रती महिना ३००० पेन्शन मिळेल अशी असंघटीत कामगार योजना आहे.त्यामध्ये आपले वय जर १८ ते ४५ मध्ये असेल तर आपण त्यात पात्र होऊ शकता पण ई श्रम कार्ड व  असंघटीत कामगार पेन्शन  योजना या दोन्ही योजना वेगळ्या आहेत.ई श्रम कार्ड ला सध्या कोणतीही पेन्शन मिळणार नाही परंतु शासन भविष्यात अपातकालीन परिस्थिती मध्ये आपल्याला मदत करू शकते.Eshram Card Holder Pension 2023

तर अशा प्रकारे आपल्याकडे माहिती आहे.आणि हा लेख आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हास कमेंट मध्ये नक्की कळवा

 

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top