desi cow milk:
महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे,राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळणार याबद्दलची चर्चा आपण वेळोवेळी ऐकत होता व यासाठी शासनाकडून आपल्याला आपल्या गुरांची सर्व माहिती टॅगिंग करण्यासाठी सांगितलं होतं आणि त्या दृष्टीने सर्व शेतकरी बंधूंनी सर्व गुरांची नोंद ही पशुधन ॲप मध्ये नोंद केली आहे व याचा जो निधी आहे तो पुढील आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभाग यांच्यामार्फत 16 मार्च 2023 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे
आता हा निधी पुढील आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी द्वारे वर्ग केला जाणार आहे
शासन निर्णय पहा