Solar pump online apply:शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आता मागेल त्याला मिळणार सौर कृषी पंप,असा करा अर्ज,

Solar pump online apply:

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने एक मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये आता मागील त्याला सौर कृषी पंप मिळणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे आता सर्वांना कृषी पंप मिळणार आहे तर तो कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया

Solar pump online apply

शेतकरी बंधूंनो कुसुम सोलर योजना असेल किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना असेल या दोन्ही योजनेसाठी आता आपण जर अर्ज केला तर आपल्याला शंभर टक्के लाभ यामध्ये मिळणार आहे कारण की जो शेतकरी अर्ज करणार आहे त्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ देण्याचा निर्णय राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी घेतलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना याचा फायदा होणार आहे यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारच्या सूचना शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने देण्यात आलेले आहेत याबाबत काल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे

 

योजनेमध्ये सहभागी होणसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती हवीत

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँकेचे पासबुक
  • सात बारा
  • आठ अ
  • फोटो

अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्यासाठी सर्व शेतकरी बंधूंनी कुसुम सोलर योजनेच्या ऑफिसियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज भरायचे आहेत अर्ज प्रक्रिया सद्यस्थितीला बंद आहे परंतु 7 जुलै नंतर यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे

या योजनेसाठी आपण तीन एचपी पाच एचपी व 7.5 एचपी साठी अर्ज करू शकता यामध्ये 90 टक्के अनुदान आपल्याला यामध्ये मिळणार आहे

अर्ज करायचा असेल तर आपण जवळील ई सेवा केंद्रामध्ये अर्ज करू शकता सद्यस्थितीला अर्जाची वेबसाईट बंद आहे परंतु पुढील दोन दिवसांमध्ये वेबसाईट सुरू होणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे

या योजनेअंतर्गत मागील त्याला सौर कृषी पंप मिळणार आहे अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती आपल्याला जर अशा स्वरूपामध्ये जाणून घ्यायचे असेल व अशाच डेली अपडेट आपल्याला हवे असतील तर आपण खालील टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता यावरती अचूक व अपडेट माहिती सादर केली जाईल त्यासाठी खालील ग्रुप जॉईन करा व जशी अर्ज प्रक्रिया सुरू होईल तसे आपण पर्यंत सर्व माहिती सादर करण्यात येईल

अशाच माहितीसाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top