नेमकी योजना काय आहे ते पाहूयात?
शेतकरी बंधूनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला किसान मानधन योजनेसाठी एक अर्ज भरावा लागेल. अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्याचे किसान मानधन योजनेचे खाते बँक मध्ये उघडले जाते. त्याच्यानंतर शेतकऱ्याला त्याच्या वयानुसार ठराविक रक्कम त्या खात्यामध्ये महिन्याला भरावी लागते. शेतकरी जेवढी रक्कम त्या खात्यामध्ये भरतो तेवढेच रक्कम केंद्र सरकार मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाते,अशाप्रकारे शेतकऱ्याला वयाच्या साठ वर्षापर्यंत हे पैसे भरावे लागतात. साठ वर्षानंतर शेतकऱ्याला पैसे या खात्यामध्ये भरण्याची आवश्यकता नाही. साठ वर्षे झाल्यानंतर शेतकऱ्याला महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन सरकार मार्फत दिली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
• आधार कार्ड.
• बँक पासबुक.
• सात बारा व आठ अ उतारा.
• पॅन कार्ड, इत्यादी.