Rain update bhima river: भीमा नदीवरील जलपर्णीमुळे पूल पडण्याचा धोका

Rain update bhima river:गेले दोन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून मुंबई ,पुणे ठाणे, सातारा,पालघर या ठिकाणी रेड अलर्ट शासनाने जारी करण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील दौंड येथे भीमा नदी च्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली असून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

परंतु नानगाव रासाई वडगाव येथील भीमा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती जलपर्णी अडकल्याने पाण्याचा विसर्ग  हा पुलाच्या पलीकडे जात नाही.नदी पर्वातील पाणी पूर्ण अडविले गेले आहे.

असेच पाणी अडले गेले तर पाणी  संपूर्ण गावांमध्ये किंवा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊ शकते.

पुलाच्या कडेला असणारे शेतजमीन शेतकऱ्यांची वाहून जाऊ शकते किंवा पूल देखील पडू शकतो अशा प्रकारचा धोका वर्तवण्यात येत आहे.

यासाठी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी शिरूर हवेलीचे माजी आमदार यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पुलाची पाहणी केली व जलपर्णी काढण्यासाठी प्रशासनाला विनंती केली, त्या अनुषंगाने प्रशासनाकडून जलपर्णी जेसीपीच्या साह्याने काढण्याचा प्रयत्न चालू आहेत.

त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला देखील याची संपूर्ण माहिती दिली असून पोलीस प्रशासनाचे टीम देखील या ठिकाणी दाखल झाली आहे. लवकरात लवकर संपूर्ण जलपर्णी ही काढावी व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाऊन शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे. त्याची नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहेत

 

Leave a Comment