राज्य शासनाची नवीन योजना
शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने बँकेच्या माध्यमातून श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना ही राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुला-मुलींना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी 5 लाखापर्यंत बिनव्याजी तसेच 5 ते 10 लाखापर्यंत 2 टक्के आणि 10 ते 15 लाखापर्यंत 4 टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकरी मुला-मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही, अशा मुला-मुलींना या योजनेच्या माध्यमातून आता त्यांचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे.