स्कॉलरशिप योजना
बऱ्याचशा विद्यार्थ्यांची शिकण्याची इच्छा असून देखील त्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण हे मधी सोडावे लागते, कारण त्यांना पैशाची अडचण असते. परंतु आता विद्यार्थ्यांसोबत असे होऊ नये आणि गरीब वंचित आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळावे तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे.
मोदी सरकारने विद्यार्थ्यांसाठी जी योजना काढली आहे त्या योजनेचे नाव प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना हे आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेअंतर्गत जे विद्यार्थ्यांनी 9 वी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत आहे, त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे.
मोदी सरकारच्या या योजने अंतर्गत जे विद्यार्थी 9 वी आणि 10वी मध्ये शिक्षण आहे आहेत त्यांना 75 हजार रुपये स्कॉलरशिप मिळते आणि अकरावी बारावी विद्यार्थ्यांना 1 लाख 25 हजार रुपये स्कॉलरशिप दिली जाते.