Nuksan bharpai 2026:संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार ते पाच दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. यासाठी शासनाच्या वतीने पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत. यासाठी आपल्याला नुकसान भरपाई शासनाकडून दिले जाणार आहे . आपल्याला अर्ज कसा करावा लागणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.
Nuksan bharpai 2026:
नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय यांना आदेश देण्यात आलेले आहेत व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसील व तलाठी कार्यालय यांना तशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेले आहे. ज्या ठिकाणी जास्त पाऊस किंवा नद्यांना पूर आलेला असेल त्या ठिकाणी पिकांचं नुकसान झालेला असेल तर त्याचे पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
आमदार खासदार व मंत्री महोदय हे देखील प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत आहेत व त्याचेमार्फत देखील पंचनामा करण्याचे आदेश आहेत
नुकसान भरपाईसाठी प्रक्रिया कशी असणार आहे हे जाणून घेऊया:
- सर्वप्रथम आपल्याला आपल्या पिकाचे नुकसान झालेले आहे याबाबतची माहिती आपल्याला तलाठी ऑफिस किंवा कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी सहायक अधिकारी यांना याबाबत माहिती द्यायचे आहे
- आपली कागदपत्र सादर करायचे आहेत व त्यांच्या मार्फत पंचनामा केला जाईल त्यानंतर आपली कागदपत्र शासन दरबारी सादर केली जातील
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँकेचे पासबुक
- नुकसानग्रस्त पिकाचा फोटो
- सातबारा आणि आठ उतारा
अशाच माहितीसाठी ग्रुप जॉईन करा