महिलांना कर्ज कशा प्रकारे दिले जाणार आहे ते पहा :
व्यवसाय करण्याचा आग्रह धरणाऱ्या महिलांसाठी आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आता विविध बँकांनी महिलांना व्यवसायात मदत करण्याचे मोठे आश्वासन दिले असून उद्योगिनी योजना राबवली जात आहे. केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार बँका महिलांना कर्ज वितरित करत आहे.
त्यामुळे या योजनेअंतर्गत महिलांना 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे आणि विशेष म्हणजे हे कर्ज तारण न ठेवता दिल्या जाणार आहे.
कमीत कमी कर्ज व जास्तीत जास्त कर्ज किती मिळणारे ते पहा
या योजनेअंतर्गत महिलांना कमीत कमी 3 लाख व जास्तीत जास्त 5 लाखापर्यंत कर्ज मिळणार असून हे कर्ज व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. तर SC,ST आणि शारीरिक दृष्ट्या अपंग महिलांना बिनव्याजी कर्ज दिले जाईल. परंतु इतर महिलांना त्यासाठी व्याज द्यावे लागेल. (Women loan Scheme)