ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यातत आलेले आहे. शेतकऱ्यांनी जर या योजनेसाठी अर्ज भरला तर पुढे अकस्मात शेतकऱ्याचा अपघात झाला किंवा दुखद निधन झाले तर त्याच्या घराला 2 लाख रुपये पर्यंत विमा दिले जाते. जेणेकरून त्यांच्या घराला आर्थिक मदत मिळेल.
शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. आपल्याला जर या योजनेचा अर्ज भरायचा असेल तर यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत ते पाहुयात.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- बँक खाते क्रमांक.
- रेशन कार्ड.
- उत्पन्नाचा दाखला.
- रहिवासी दाखला.
- जातीचा दाखला.
- सातबारा उतारा, इत्यादी.
आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर वरील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.