Digital ration card download process :
डिजिटल स्वरूपातील रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी पुढील प्रक्रिया आहे
1. सर्वप्रथम आपल्याला https://rcms.mahafood.gov.in/ या वेबसाईट वरती जायचं आहे.
2. त्यानंतर रेशन कार्ड या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचा आहे.
3. त्यानंतर know your ration card या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचा आहे.
4. त्यानंतर आपल्याला कॅपच्या कोड व्हेरिफाय करायला विचारलं जाईल खाली जो कॅपचा असेल तो त्या ठिकाणी टाकून आपल्याला वेबसाईट वेरिफाय करायचा आहे.
5. त्यानंतर रेशन कार्ड नंबर ओल्ड रेशन कार्ड नंबर विचारला जाईल या ठिकाणी आपल्याला आपला बारा डिजिटल ऑनलाईन रेशन कार्ड नंबर टाकणे आवश्यक आहे.
6. इतर जर नंबर टाकला तर आपला रेशन कार्ड आपल्याला दिसणार नाही.
7. 12 अंकी डिजिटल रेशन कार्ड नंबर काढण्यासाठी आपण खालील लिंक वरती क्लिक करून देखील बारा रजिस्ट्रेशन कार्ड नंबर काढू शकता किंवा आपल्या रेशन कार्ड नंबर वरती बारा डिजिटल नंबर सादर केलेला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे.
8. त्यानंतर गेट रिपोर्ट वरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर प्रिंट युवर रेशन कार्ड या पर्यायावर क्लिक करायचा आहे. आपल्या रेशन कार्ड आपल्याला डाऊनलोड झालेल्या दिसते. त्याची प्रिंट मारून आपण तलाठी भाऊसाहेब यांची सही घेऊ शकता. आपल्याला यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. अशा प्रकारे आपण आपले डिजिटल रेशन कार्ड काढू शकता.
12 अंकी रेशन कार्ड नंबर काढण्यासाठी येथे क्लिक करा