pension scheme in india

pension scheme in india

अर्ज कोणाकडे करावा लागेल?

सदर योजनेचा अर्ज करायचा असेल तर आपल्याला आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी सन्माननीय नायब तहसीलदार साहेब यांच्याकडे आपल्याला अर्ज करावा लागेल

संचालक मंडळ वरती कोण असतं:

सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज केल्याच्या नंतर यामध्ये अध्यक्ष म्हणून सन्माननीय तहसीलदार साहेब काम पाहत असतात. या व्यतिरिक्त देखरेख समितीमध्ये आपल्या तालुक्यामधील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यामध्ये सभासद असतात त्यानंतर आपण त्या सभासदांकडे आणि तहसीलदार साहेबांकडे अर्ज  करणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला योजनेसाठी आवश्यक असणारा फॉर्म याबरोबर आवश्यक असणारी कागदपत्रे  एकत्रित गोळा करून याचा संपूर्ण सेट आपल्याला सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज सादर करायचा आहे.

त्यानंतर अर्ज सादर केल्याच्या नंतर त्याची ऑफिस कॉपी आपल्याजवळ ठेवायचे आहे मग त्यानंतर प्रत्येक महिना किंवा दोन महिने किंवा तीन महिने जशी अर्ज उपलब्ध होतील त्याप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी एक मीटिंग आयोजित केली जाते.

या मीटिंगमध्ये सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व इतर समिती यांच्या संचालक मंडळासमोर तालुक्याचे ठिकाणी उपलब्ध झालेल्या सर्व अर्जाचे पडताळणी केली जाते म्हणजेच खरोखरच कोणत्या व्यक्तीला गरज आहे हे पहिले जाते

त्यांना संजय गांधी निराधार योजनेची गरज आहे का हे पाहिलं जातं आणि जे खरोखर गरजू लाभार्थी आहे त्यांची यामध्ये निवड प्रक्रिया केली जाते आणि त्यास ही मीटिंग मान्यता देते आणि त्यानंतर मग आपल्याला या योजनेचा लाभ दिला जातोSanjay Gandhi Niradhar Yojana”

पैसे मिळायला सुरवात कधी होते?

तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज प्रस्ताव सादर केल्याच्या नंतर अर्जाची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर मीटिंगमध्ये आपल्या अर्जाला मान्यता दिल्यानंतर सरासरी तीन महिन्याच्या नंतर आपल्याला पैसे मिळायला सुरुवात होते

तर अशा प्रकारे आपल्याला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आपण पात्र होऊ शकतात या योजने संदर्भात जर आपल्याला काय अडचणी असतील तर आपण आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून व्हाट्सअपच्या माध्यमातून टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आपण आमच्याशी संपर्क करू शकता. किंवा कमेंट्स मध्ये देखील आपण आपल्या शंका विचारू शकता

आपण जास्तीत जास्त गरजूंनी या योजनेमध्ये पात्र व्हावे अशी या लेखाच्या माध्यमातून मी आपणास विनंती करतोSanjay Gandhi Niradhar Yojana”

error: Content is protected !!
Scroll to Top