महाडीबीटी पोर्टल वरती अनुदान बियाणे घेण्यासाठी व प्रत्यक्ष अंतर्गत बियाणे वितरण साठी खरीप हंगाम 2023 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाले आहे. या ठिकाणी बियाणे सुद्धा दिले जातात किंवा घेण्यासाठी अनुदान देखील दिले जात आहे.
खरीप हंगाम 2023 बियाणे अनुदान :
शेतकरी बंधूंनो, आपण मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, नाचणी इत्यादी पिकांच्या बिया करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा
- आठ अ उतारा इत्यादी
अर्ज कशाप्रकारे करता येणार आहे ते पहा :
शेतकरी बंधुनो, आपल्याला यासाठी अर्ज महाडीबीटी पोर्टल वरती आपली लॉगिन आयडी उपलब्ध असल्यास आपली आयडी त्यावरती लॉगिन करून बियाणे अनुदान साठी अर्ज करू शकता किंवा जवळील महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील ऑनलाईन अर्ज करू शकता.
शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.
धन्यवाद !