महाडीबीटी रजिस्ट्रेशन :
महाडीबीटी पोर्टल वरती शेतकरी मोबाईल वरूनच नोंदणी करू शकतात. तसेच अर्ज/फॉर्म देखील भरू शकतात.
या ऑनलाईन रजिस्ट्रेशन मुळे शेतकऱ्याचे वेळ ही खूप वाचत आहे व ऑनलाईनच्या माध्यमातून अगदी काही वेळामध्ये विविध योजनांसाठी अर्ज भरता येत आहे. व ऑफलाइन स्वरूपात असल्याकारणाने शेतकऱ्यांचा वेळ खूप जात होता व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करणे इत्यादी कामांसाठी खूप कालावधी देखील जात होता.
परंतु सध्याच्या या ऑनलाइन रजिस्ट्रेशन मुळे आपण घरबसल्या कोणत्याही नवीन महाडीबीटीवरच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज अगदी काही क्षणामध्ये भरू शकता.