जुना शासन कायदा काय सांगतो ते पहा :
जमीन नावावर करण्यासंदर्भातील जर तुम्ही जुना शासन निर्णय किंवा कायदा पाहिला तर त्या ठिकाणी तुम्हाला वडिलोपार्जित जमीन कुटुंबातील मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर करण्यासाठी जमिनीच्या बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क शासनाला द्यावा लागतो.
परंतु एखाद्या गरीब शेतकऱ्याला ही रक्कम परवडण्याजोगी नव्हती. त्यामुळे शासनाकडून यामध्ये बदल करून नवीन नियनुसार फक्त 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर आपण आपल्या संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकतो. आणि वडिलोपार्जित मयत व्यक्तीच्या नावावर जमीन वारसदार म्हणून आपल्या स्वतःच्या नावाने किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावानेे करू शकतो.