Kusum Solar Yojana

Kusum Solar Yojana

कृषी महा ऊर्जा अभियान pm किसान घटक यासाठी ऑनलाइन पोर्टल 17 मे 2023 रोजी सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात आपल्या क्षेत्रानुसार 3, 5 HP 7.5 HP क्षमतेचे सौर कृषी पंप आपण आपल्या शेतामध्ये बसू शकता.

यासाठी जे अनुदान आहे आपण जर ओपन कॅटेगिरी मधील असेल तर आपल्याला 10 टक्के रक्कम भरायचे आहे. उर्वरित 90% हे अनुदान असणार आहे आणि SC,ST  साठी 95 टक्के अनुदान असणार आहे, म्हणजे आपण ओपन कॅटेगिरी पाहिलं तर 3HP  सौर कृषी पंपासाठी फक्त 19,380 रुपये,  5HP साठी 26,975 रुपये व 7.5 HP साठी सरासरी 37,440 रुपये एवढी जी रक्कम आहे ती आपल्याला भरावे लागणार आहे.

आपल्याला जर हा ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर www.mahaurja.com या वेबसाईट वरती आपल्याला अर्ज भरायचा आहे.

 सूचना

शेतकरी बंधूंनो सद्यस्थितीला ही वेबसाईट सुरू आहे, परंतु ह्याच्यावर जास्त ताण असल्यामुळे काही वेळा वेबसाईट ओपन होत नाही परंतु आपल्याला प्रयत्न करत राहायचे आहे.

अशा प्रकारची आजची ही एक महत्वपूर्ण अपडेट आहे.

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top