उत्पन्नाचा दाखला अर्ज कसा भरावा
1.लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला अनेक ऑप्शन पाहायला मिळतील त्यामधून आपण महसूल विभाग येथे क्लिक करायचे आहे.
2. त्यामध्ये तुम्हाला उपविभागामध्ये revenue service हा ऑप्शन निवडावा लागेल.
3. महसूल सेवांमध्ये उत्पन्न दाखला हा ऑप्शन दिसेल तो निवडा आणि पुढे जा या ऑप्शन वर क्लिक करा.
4. पुन्हा तुम्हाला उत्पन्न दाखला पर्याय निवडावा लागेल आणि पुढे जा या बटन वरती क्लिक करावे लागेल.
5. त्यानंतर मोबाईल मध्ये एक फॉर्म सुरू होईल त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला उत्पन्न दाखला किती वर्षाचा काढायचा आहे ते निवडावे लागेल
6. अर्जदाराची वैयक्तिक माहिती अर्जदाराचा पत्ता कुटुंबाची माहिती उत्पन्न दाखला कोणासाठी काढायचा आहे व इत्यादी माहिती व्यवस्थित अचूक माहिती भरावी.
7. शेती असेल तर त्याबद्दल माहिती भरावी लागेल त्यानंतर उत्पन्नाबद्दलची माहिती भरावी व आपण तलाठी उत्पन्न दाखला सोबत जोडत असाल तर तलाठी अहवाल पर्याय निवडावा.
8. अटी मान्य आहे चौकोनात क्लिक करावे व त्यानंतर आवश्यक ते कागदपत्रे अपलोड लागेल.
व फक्त काही तासानंतर आपल्याला उत्पन्न दाखला डाऊनलोड करण्यासाठी मेसेज येईल
तर अशा पद्धतीने आपण उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज भरू शकता
बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.