फेसबुक काय आहे ते सर्वप्रथम जाणून घेऊयात :
फेसबुक हे नाव अनेकांनी ऐकलेले आहे. हे एक सोशल मीडिया नेटवर्क आहे. ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या नातेवाईकांसोबत आणि मित्रांसोबत ऑनलाइन जोडले जाऊ शकतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास हा तर लोकांशी जोडले जाण्याचा एक सोपा मार्ग आहे.
जसे आपल्याला आधीच माहित आहे की फेसबुक बिलकुल फ्री आहे. यामध्ये आपण फ्री मध्ये अकाउंट बनवू शकतो. यामध्ये तुम्हाला हवेत तितके पेजेस तुम्ही बनवू शकता आणि तुम्हाला हवा तितका वेळ याचा वापर तुम्ही करू शकता.
एक गोष्ट मी तुम्हाला आधीच सांगतो की फेसबुक वर कोणतेही काम करण्याचे फेसबुक तुम्हाला पैसे देत नाही. परंतु ही गोष्ट देखील तितकीच खरे आहे की फेसबुकचा वापर करून पैसे नक्कीच कमवता येतात, कारण फेसबुक वर करोडो लोकांचे अकाउंट बनलेले आहेत. आपल्याला या लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर फेसबुक हे सर्वात प्रभावी माध्यम आहे.